तेलंगणातील शमशाबाद येथील हनुमान मंदिराची तोडफोड

07 Nov 2024 20:16:32
 
Hanuman temple
 
रंगारेड्डी : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद येथील हनुमान मंदिराची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेप्रसंगी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली आहे.
 
विमानतळ वसाहतीतील हनुमान मंदिराच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यानुसार आम्ही आमची टीम तैनात केली आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी आले आहेत. शमशाबादचे डीसीपी बी राजेश यांनी एनआयला सांगितले. घटनास्थळी असलेल्या उपस्थि असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात व्यक्तीने मालमत्तेचे नुकसान केले. आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे.
 
दरम्यान यावेळी घटनास्थळी असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत स्थानिकांन निदर्शने केली आहेत. आलिकडे काही महिन्यांमध्ये हैदराबाद येथे हिंदू मूर्तीची तोडफोड, भारतीय जनता पक्ष आणि इतर धार्मिक संघटनांकडून निषेध भडकण्याच्या दोन वेगळे घटना घडल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0