तेलंगणातील माता पोचम्माच्या मूर्तीची विटंबना

07 Nov 2024 16:07:07
 
Telangana
 
पेड्डापल्ली : तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यात माता पोचम्म थल्लीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काली मातेचा अवतार मानल्या जाणाऱ्या माता पोचम्माच्या मूर्तीची विटंबना केल्याबद्दल हिंदू समाजात संताप असून ही घटना बुधवारी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली आहे.
 
मंदिरात असलेल्या मूर्तीची तोडफोड करतानाचे काही छायाचित्रे भाजपच्या तेलंगणाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात हिंदू मंदिरांमधील मूर्तींवर हल्ला करण्यात आल्याच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. याप्रकरणात आता आणखी वाढ होऊ लागली आहे. मात्र तेलंगणा सरकार मूग गिळून गप्प असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावेळी तेलंगणा भाजपने काँग्रेसची लाज काढली आहे.
 
 
 
याआधी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे मुथ्यासम्मा मातेच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी हिंदूंनी कट्टरपंथी सलीम नावाच्या व्यक्तीला पकडले गेले होते. 
 
Powered By Sangraha 9.0