कट्टरपंथी मोहम्मदकडून गणेश मूर्तीची विटंबना

07 Nov 2024 19:40:01

Ganesha
 
छिंदवाड : मध्य प्रदेशातील छिंदवाड येथे रविवारी ३ नोव्हेंबर रोजी कट्टरपंथी युवक मोहम्मद तौफिकने हिंदू धर्मामध्ये बुद्धीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या भगवान गणेशजींच्या मंदिरात जबरदस्तीने घुसून मूर्तीची तोडफोड केली आहे. यानंतर आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलसारख्या हिंदू संघटनांनी मोहम्मद तौफिकनने केलेल्या कृत्याविरोधात तक्रार दाखल केली असून अटक करण्याची मागणी केली होती.
 
कट्टरपंथी आरोपी मोहम्मद तौफिक या युवकाने साडेदाहा वाजता जुन्नरदेव येथील गणेश मंदिरात घुसखोरी केली. यावेळी गणरायाच्या मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घ़डला आहे. दरम्यान याप्रकऱणात एका महिलेने आरडाओरड केली असता घटनास्थळी काही लोक त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी कट्टरपंथी मोहम्मद तौकिफला घटनास्थळी असलेल्या हिंदूंनी पोलिसांच्या हवाली केले होते.
 
 
 
याचपार्श्वभूमीवर आता पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक हिंदूंना आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच छिंदवाड येथे ४ नोव्हेंबर रोजी हिंदू संघटना आणि व्यापाऱी संघटनांनी शहरात बंदची हाक दिली होती. दरम्यान, जामा मशिद कमिटीने मोहम्मद तौफिकच्या संतापजनक कृत्याचा दावा त्याच्यावर कारवाईचे करण्याची मागणी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0