पीएम विद्यालक्ष्मी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

06 Nov 2024 18:18:00

Modi

नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे.
पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका साध्या, पारदर्शक आणि विद्यार्थी-अनुकूल प्रणालीद्वारे प्रशासित केली जाईल जी आंतर-कार्यक्षम आणि संपूर्णपणे डिजिटल असेल.

या योजनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, देशातील सर्वोच्च ८६० दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज (अभ्यासासाठी कर्ज) देण्यात आले आहे. या अंतर्गत, दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कव्हर लोन दिले जातील, त्याचप्रमाणे ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी भारत सरकारकडून ७५ टक्के क्रेडिट हमी दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने भारतीय अन्न महामंडळाला खेळते भांडवल उपलब्ध होण्‍यासाठी २०२४ - २५ या आर्थिक वर्षात १०,७०० कोटी रुपये इतक्या समभाग गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.कृषी क्षेत्राला चालना देता यावी तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करता यावे, या उद्देशाने मंत्रिमडळाने या निर्णयाला मान्यता दिली.

Powered By Sangraha 9.0