वक्फ बोर्डाने कानिफनाथ देवालाही सोडलं नाही

वक्फ बोर्डाचा कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर दावा

    06-Nov-2024
Total Views | 210
 
Untitled 21
 
अहिल्यानगर : कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील मढी गावात असलेल्या यामुळे आता वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यामुळे कानिफनाथ संस्थान यांनी विरोध दर्शवला आहे. कानिफनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय बाजीरावर मरकड यांनी वक्फ बोर्डाचा निषेध केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
पूर्व -ब्रिटीश काळापासूनची मालकी सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. मंदिराचे दर्गाहमध्ये रुपांतर करण्याच्या कथित प्रयत्नादरम्यान वादाचे तणावात रुपांतर झाले होते. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकारणाकडे गेले आहे. तेव्हापासून न्यायाधिकरणाने मंदिराच्या संरचनेत बदल करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचा आता आदेश जारी केला आहे.
 
२०११, २०१२ आणि २०१७ रोजी वक्फ बोर्डाने कानिफनाथ मंदिराला नोटीस जारी केली होती, अशी माहिती कानिफनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,कानिफनाथ देवाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांआधी कानिफनाथ हे राजयोगी होते. ७०० शिष्य, हत्ती उंट, सेवक आणि सैनिक त्यांच्याकडे होते. त्यावेळी राजे महाराजे यांनी त्यांना इनामी जमीन दिल्याची माहिती कानिफनाथ संस्थेचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांनी दिली आहे.
 
दरम्यान केवळ मंदिरच नाहीतर काही उद्योगपती, धार्मिकस्थळांवर वक्फ बोर्ड दावा करत आहे. एका बाजूला वक्फ बोर्ड संशोधनासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मात्र आता त्याला एक विशिष्ट समाज एकत्र येऊन त्याला विरोध करत आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121