खलिस्तानांच्या भ्याड हल्ल्यावर जयशंकर संतापले!

05 Nov 2024 12:47:40

canada j
 
नवी दिल्ली : कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाचा चांगलाच समाचार घेतला आहे. जयशंकर म्हणाले की " काल ज्या प्रकारे हिंदू मंदिरावर जो हल्ला झाला तो चिंताजनक आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच बरोबर भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणे ही बाब सुद्धा असभ्य होती. कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर न करता भारतावर आरोप करायचा हे आता कॅनडा सरकारचे धोरणच होऊन बसले आहे."

खलिस्तानी झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांची सोमवारी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात लोकांशी चकमक झाली होती. सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ मंदिरामध्ये बॅनरबाजी केल्याचे दिसून आले आहे. काही व्हिडिओंमध्ये हिंदू सभा मंदिराच्या आजूबाजूच्या मैदानावर लोक एकमेकांवर हल्ला चढवत असल्याचे सुद्धा दिसून आले आहे. या हल्ल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिथल्या काही नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खलिस्तानी लोकांनी केलेल्या भ्याड हल्लायचा निषेध केला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकरचा हात असल्याचा आरोप ट्रूडो केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध बिगढले. भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अपमानास्पाद वागणूक देण्यात आली. हत्येप्रकरणात सर्व पुरावे समोर असताना देखील, वारंवार भारतविरोधी प्रचार सुरू झाला. यामुळे खुद्द ट्रुडो यांचे सरकार अडचणी आले आहे. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 
Powered By Sangraha 9.0