'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची दिवाळीत बंपर कमाई!

04 Nov 2024 15:05:57
 
singham again
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
 
दरम्यान, ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ ने तीन दिवसांत किती कमाई केली आहे याची माहिती सॅकनिल्कने दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी ४३.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी कमवत तीन दिवसांत या चित्रपटाने १२१.७५ कोटींची कमाई केली आहे. तर भूल भूलैय्या ३ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.५ कोटी कमवत तीन दिवसांत १०६ कोटींची कमाई केली आहे.
 
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, करिना कपूर, अर्जून कपूर, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ अशी कलाकारांनी फौज आहे. तर ‘भूल भूलैय्या ३’ या चित्रपटात विद्या बालन, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0