मुंबई : ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ संचलित ‘श्रीशिवशंभू विचार मंच’ यांच्यावतीने शिवभक्त संमेलन परमपूज्य रामगिरी महाराज यांचे ’शिवरायांच्या ( Shree Shivaji Maharaj) आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज : काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वैद्य सभागृह, राजा शिवाजी शाळा संकुल, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित केले आहे. या व्याख्यानासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण प्रांत संयोजक अभय जगताप आणि महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात यांनी केले आहे.