खलिस्तानी जमावाने कॅनडातील हिंदू भाविकांवर केलेल्या हल्ल्यात ट्रूडो यांचा निषेध

04 Nov 2024 17:11:05

Khalistani
 
कॅनडा : खलिस्तानी (Khalistani)  गटाने हिंदू गटाला लक्ष केले गेले असल्याची घटना कॅनडा येथे घडली आहे. मात्र या हल्ल्याला आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी ब्रॅम्प्टन येथील मंदिरात हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. देशात हिंसाचाराची कृत्ये अस्वीकार्य आहेत. रविवारी हिंदू मंदिरात भाविकांच्या एका गटाला कथित खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले गेले. यामुळे आता याप्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.
 
जस्टिन ट्रूडो म्हणाले, ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरात झालेला हिंसाचार असंवेदनशील आहे. प्रत्येक कॅनेडियनला मुक्तपणे आणि सुरक्षितपणे त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि या घटनेचा तपास करण्यासाठी दिलेला त्वरित प्रतिसादाला पोलिसांनी आभार मानले आहेत.
 
दरम्यान या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कॅनेडियन तरुण हे हिंदू मंदिर आणि भक्तांच्या अंगावर हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे. जमाव खलिस्तान समर्थक गटांशी संबंधित झेंडे घेऊन दिसत आहेत. हिंदू कॅनेडियन फाऊंडेशन, एक ना-नफा कम्युनिटी ऑर्गनायझेशन, ज्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत मुले आणि महिलांवरही हल्ले झाले आहेत.
 
मिळालेल्या एका वृत्तानुसार, हल्ला होण्याआधी खलिस्तानी समर्थकांचा एक गट १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या स्मरणार्थ निदर्शने करत होता. या घटनेने घटनास्थळी असलेल्या परिसरात तणाव वाढला आणि मोठ्या प्रमाणात कॅनडा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर आता कॅनेडियन पोलिसांनी गुन्हेगारी कृत्य करणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे आरोपींवर गुन्हे दाखल केले जातील यावर विश्वास दाऱ्शवला आहे.
 
Powered By Sangraha 9.0