मुंबई : नारायण देसाई फाउंडेशन तर्फे ‘कथालेखन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य व संस्कृतीचे संवर्धन व विकास करण्यासाठी तसेच नवलेखकांना/कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नवलेखकांना कथा तयार करण्याची आणि लेखन कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. लेखनाच्या विविध तंत्रांवर चर्चा पात्रांची निर्मिती करणे, संवाद लेखन करणे या गोष्टी या कार्यक्रमात शिकवल्या जाणार आहेत. सिनेमा, साहित्य क्षेत्रात काम करणारे लेखक या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या नवलेखकांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभाग नोंदविण्यासाठी ७०२१६४२८२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.