विद्यार्थ्यांनी बनवली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

    30-Nov-2024
Total Views |
Pratapgad

नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगून शिवगर्जना, शिवस्तुती आणि पोवाडा यांचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या इतर किल्ल्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने शिवकालीन शस्त्रे, वाघनखे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून शिवचरित्राचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन यात आपला सहभाग नोंदविला. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकानीता पाटील, शालेय समिती अध्यक्षा सुवर्णा दाबक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.