टेस्ला आणि स्टारलिंकची भारतात एन्ट्री ?

पियुष गोयल यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती

    30-Nov-2024
Total Views |

musk goyal
 
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. उद्योग जगतात यामुळे भारताने नवीन शिखरं गाठली आहेत. अशातच आता टेसला आणि स्टारलिंक यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
 
नवी दिल्ली इथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पियुष गोयल म्हणाले की अद्याप तरी, एलोन मस्क यांच्याशी संवाद साधला गेलेला नाही. गोयल म्हणाले " आता पर्यंत तरी आम्ही मस्क यांच्याशी संवाद साधलेला नाही. वेगवेगळ्या मंत्रालयांच्या माध्यमातून गुंतवणूकीचा कारभार हाताळला जातो. त्या त्या विभागातील नेतृत्वाच्या माध्यामातून पुढची बोलणी होईल. एलोन मस्क हे भारतात पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यायला येणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू होती. परंतु मस्क आपल्या कामाच्या व्यापात व्यस्त असल्यामुळे त्यांना यायला जमले नाही. तज्ञांकडून असा अंदाज वर्तवला जात होता की टेस्ला भारतात उत्पादन युनिट उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुक करणार आहे. त्याच बरोबर भारतात लवकरात लवकर टेस्ला इलेक्ट्रिक कारची विक्री करण्याचा मार्ग मोकळा होईल असे सुद्धा मत त्यांनी व्यक्त केले होते. याशिवाय, या वर्षी मार्चमध्ये, सरकारने भारतात उत्पादन युनिट्स उभारणाऱ्या कंपन्यांसाठी आयात शुल्कात सवलत देणारे इलेक्ट्रिक-वाहन धोरण मंजूर केले, ज्याचा उद्देश यूएस-आधारित टेस्ला सारख्या प्रमुख जागतिक खेळाडूंना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आहे.