तीन महिन्यांपूर्वी पोलीस भरती; बस अपघातात गमावला जीव
महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी हिचा दुर्देवी मृत्यू !
30-Nov-2024
Total Views |
गोंदिया : (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत तब्बल ११ निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बस अपघातात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील एक सुर्यवंशी कुटुंब आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलीस भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचे या बस अपघातात दुर्देवी निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला, परिवाराला सांभाळण्यासाठी तिने मेहनत घेतली. मात्र, सुर्यवंशी कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव येथील रहिवाशी स्मिता सुर्यवंशी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू - सासरे व एका छोट्याशा बाळासह हालाखीचे जीवन जगत असताना स्मिता यांना पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपल्या परिवारांना भेटून स्मिता दि. २९ नोव्हेंबरला आपल्या कामावर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला निघाल्या होत्या. गोंदियाला जाण्यासाठी याच बसने प्रवास करत असताना हा अपघात घडल्याने स्मिता यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे -