मुंबई : ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेसाठी २७ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, निर्मात्यांनी २७ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे.
१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी प्रवशिका पाठवता येणार आहेत. प्रवेशिका filmcitymumbai.org या संकेतस्थळावर आणि जनसंपर्क विभागात उपलब्ध आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी विहित मुदतीत प्रवेशिका आवश्यक त्या कागदपत्रांसह चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या जनसंपर्क विभागात जमा कराव्यात असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.