वाराणसी: संस्कृती आणि कलेचा वारसा असलेल्या वाराणसी शहरात आंतरराष्ट्रीय ‘मणिकर्णिका फिल्म फेस्टिवल’ पार पडणार आहे. १३ ते १५ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात भारतीय आणि विदेशी कलाकारांनी तयार केलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत.
मणिकर्णिका फिल्म फेस्टिवल ट्रस्ट आणि नाटक मंडळी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कबीरचौरा येथील नागरी नागरी मंडळात हा महोत्सव होणार आहे. यावेळी या महोत्सवात हिंदी, भोजपुरी, बंगाली, तमिळ, आसामी आणि मराठी अशा विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. “या महोत्सवासाठी जवळपास १५० चित्रपट पाठवण्यात आले होते, त्यातून निवड समितीने ५५ ते ६० चित्रपटांची निवड केली आहे” अशी माहिती दिग्दर्शक सुमित मिश्रा यांनी दिली. या महोत्सवात चित्रपटांचे प्रदर्शन तर होणारच आहे पण सोबतच या क्षेत्रातील दिग्गज मंडळी, कलाकार आणि प्रेक्षकांतर्फे त्यावर चर्चा सुद्धा केली जाणार आहे. काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट पाहण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांना या महोत्सवात मिळणार आहे.