रोहिंग्याची बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी, बनावट कागदपत्रे बनवत बंगालमध्ये केला विवाह
महाविद्यालयाला भेट देत वक्फ बोर्डप्रकरणाची माहिती मिळवण्याचा होता कट
30-Nov-2024
Total Views |
वाराणसी : उत्तर प्रदेशात दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी २९ नोव्हेंबर २०२४ म्यानमारमधील रोहिंग्या घुसखोर मोहम्मद अब्दुल्लाला वाराणसी येथून अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीने भारतात घुसखोरीच केली नसून त्यांनी वाराणसी येथील ज्ञानव्यापीसह चार मशिदींची रेकी केली होती असे सांगण्यात येत आहे. अब्दुल्ला यांनी बनावट कागदपत्रे बनवली होती. ज्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्डाचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हा पश्चिम बंगाल येथून मेदिनीपूर जिल्ह्यातील दुर्गाबंकाटी भागात राहत असल्याचे वृत्त आहे. गुरूवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी तो ट्रेनने वाराणसी येथे पोहोचला आणि शहरातील विविध ठिकाणी फिरतीवर होता. वक्फ बोर्डप्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विद्यालयाला भेट दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी ज्ञानवापी येथे पोहोचून तेथील लोकांशी संपर्क साधण्याचे काम केले.
त्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगालला परतण्यासाठी रेल्वेत चढत असताना त्याला वाराणसी कँट स्टेशनवरून अटक केली. मोहम्मद अब्दुल्ला असे म्यानमार येथे राहणाऱ्या या रोहिंग्याचे नाव असून त्यानेही आपल्या समुदायातील म्यानमार येथील इतर घुसखोरांना बांगलादेशातील सिमा ओलांडण्यासाठी मदत केली असल्याचे वृत्त आहे.
चौकशी वेळी अब्दुल्लाने बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्यात मदत केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो म्यानमारच्या अक्याब या जिल्ह्यातील मांगडूचा रहिवासी आहे. आतापर्यंत, त्यांनी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील दुर्गाबंकटी येथे त्यांचे घर बांधले आहे. अब्दुल्ला २०१८ पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे मेदिनीपूर येथे राहत होता. त्याचवेळी त्याने आपला विवाह केला होता. दहशतवादी विरोधी पथकाने अब्दुल्ला यांच्या पत्नीच्या माहितीचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.