बेंगळुरू : (Land Jihad) शेतकऱ्यांच्या जमीनी बळकवण्याचा प्रयत्न केल्या नंतर, कर्नाटकतील वक्फ बोर्डाने आपला मोर्चा ऐतिहासिक वास्तूंकडे वळवला आहे. वक्फ बोर्डाने कर्नाटकातील किमान ५३ ऐतिहासिक वास्तूंवर दावा केला आहे, ज्यावर सध्या काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. या स्मारकांमध्ये गोल गुम्बाझ, इब्राहिम रौझा, बारा कामन, बिदर आणि कलबुर्गी येथील किल्ले आणि इतरांचा समावेश आहे. ५३ पैकी ४३ स्मारके कर्नाटकातील विजयपुरा (जी एकेकाळी आदिल शाह्यांची राजधानी होती) येथे आहेत. ६ हम्पीमध्ये आहेत तर ४ बेंगळुरू सर्कल येथे स्थित आहेत.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद मोहसीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे (वैद्यकीय शिक्षण) प्रधान सचिव असताना विजयपुरा वक्फ बोर्डाने २००५ मध्ये ४३ केंद्र-संरक्षित स्मारकांना वक्फची मालमत्ता म्हणून घोषित केली. वक्फ बोर्ड हक्काच्या नोंदी आणि मालमत्तेच्या सरकारी प्रमाणपत्राचा फायदा घेत असल्याची माहिती सुद्धा माध्यमांना मिळाली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेच्या मालकीची जमीन असताना देखील वक्फने आपला दावा सांगितला आहे.एका एएसआय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०१२ मध्ये या स्मारकांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले होते. वक्फ बोर्डाने त्या वेळी त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. अधिकाऱ्याने सूचित केले की त्यापैकी ४३ जागांवर विजयपुरा वक्फ बोर्डाने आधीच अतिक्रमण केले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कर्नाटकचे मुख्य सचिव, विजयपुराचे उपायुक्त आणि अल्पसंख्याक कल्याण विभाग यांना स्पष्ट निर्देश देऊनही २००७ पासून केंद्रीय संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे कायम असल्याची माहिती मिळाली आहे.