योगी आदित्यनाथांना धमकी देणारी 'फातिमा' गजाआड!

03 Nov 2024 19:56:17
 
yogimm
 
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी शनिवारी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलिसांना शोध घेतला असून, सदर आरोपी एक महिला असल्याची बाब उघडकीस आली आहे. भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसात जर आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर त्यांची सुद्धा बाबा सिद्दिकी यांच्या सारखीच हत्या केली जाईल असे या महिलेने म्हटले होते.

मुंबई ट्राफिक पोलिसांना शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटसॅप मेसेज करत ही धमकी दिली होती. पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी महिलेला अटक केली. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उल्हासनगर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आली. सदर महिलेचे नाव फातिमा खान असून या प्रकरणाबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे.

कोण आहे फातिमा खान?
फातिमा खान या २४ वर्षीय महिला, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात राहते. फातिमा खानने माहिती तंत्रज्ञानात पदवी प्राप्त केली असून तिच्या वडिलांचा सुतार कामाचा व्यवसाय आहे. ही महिला सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्थिर
असल्याचे पोलिसांनी सांगितले. या धमकीच्या संदेशामागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

 
 
Powered By Sangraha 9.0