" देशातल्या न्यायाधिशांनी..." समाजवादी पक्षाच्या नेत्याची न्यायालयावर आगपाखड!

    29-Nov-2024
Total Views |

ram gopal yadav

जयपुर : राजस्थाच्या अजमेर शहा दर्गाच्या जागी मंदिर असल्यची याचिाक दाखल केल्यानंतर, आता समाजवादी पक्षाला चांगलीच पोटशूळ झाल्याचे दिसून आले आहे. सपाचे नेते राम गोपाल यादव यांनी म्हटले की " देशातल्या छोट्या छोट्या न्यायाधिशांना हा देश जाळायचा आहे." असे धक्कादायक विधान यादव यांनी केले आहे.

या गोष्टीचे निमित्त साधून यादव यांनी भाजपच्या कामावर ताशेरे ओढण्याचे काम केले आहे. भाजपला इथल्या लोकांशी काहीही देणेघेणे नसल्याचे यादव यांनी म्हटले. यादव इथेच थांबले नाहीत, त्यांनी संभळ मध्ये झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना म्हटले की " संभळ मध्ये झालेल्या हिंसाचाराला पूर्णपणे प्रशासन आणि पोलिस व्यवस्था जबाबदार आहे, जर का या घटनेची निष्पक्ष चौकशी केली गेली तर अनेक वरिष्ठ अधिकारी जेल मध्ये जातील. यापूर्वी राम गोपाल यादव यांनी संभळ येथे घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणावर बोलताना न्यायाधीशांवर असाच हल्ला चढवला होता. २५ नोव्हेंबर रोजी यादव यांनी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले आणि संसदेत या विषयावर चर्चेबाबत नोटीस दिली असल्याचे सांगितले.

राजस्थान मधील न्यायालयाने अजमेर शरीफ दर्गाच्या जागी हिंदू मंदिर असल्याची याचिका दाखल केली आहे. सप्टेंबर महिन्यात अजमेरच्या दिवाणी न्यायालयात 'ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाला' याचे नामांतर ‘भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर’ घोषित करण्यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेमध्ये सप्रमाण म्हटले आहे की दर्ग्याच्या जागी महादेव मंदिर होते. तरी तिथल्या जागेवरून ही सुफी मजार हटवण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.