पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; घर आणि कार्यालयावर ईडीची धाड!

    29-Nov-2024
Total Views |

raj kundra
 
मुंबई : (Shilpa Shetty Raj Kundra ED Raid) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी हा छापा टाकल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज कुंद्राची चौकशी केली होती.
ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या मुंबईतील जुहूमधील निवासस्थानासह आणखी बऱ्याच ठिकाणी धाडी टाकल्या असून पोर्नोग्राफिक सिनेमाची निर्मिती आणि मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे वितरणाशीसंबंधित कथित मनी लॉड्रिंगच्या तपासासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. तसेच ईडीने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशामधील १५ ठिकाणी या प्रकरणी छापेमारी केल्याची माहिती आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई गुन्हे शाखेने जुलै २०२१ मध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केली होती. नंतर काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची जामिनावर सुटका झाली होती. राज कुंद्राच्या विरोधात आयपीसीच्या कायद्याअंतर्गंत पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी खटला दाखल करण्यात आल्या होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयात चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.