मोईनुद्दीन चिश्ती दर्गा महादेवाचे मंदिर असल्याचा दावा
दर्ग्याच्या जागी हिंदू मंदिर उभारण्यासाठी याचिकेत तीन कारणे दाखल
29-Nov-2024
Total Views |
अजमेर : राजस्थानातील अजमेर न्यायालयाने मोईनुद्दीन चिश्ती यांचा असलेला दर्गा महादेवाचे मंदिर असल्याचा दावा या याचिकेत दाखल करण्यात आला. यावर पुढील सुनावणी येत्या २० डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्रालय, दर्गा समितीने आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणाच्या याचिकेत दर्गाच्या जागी हिंदू मंदिर उभारण्यासाठी तीन कारणे देण्यात आली आहेत.
पहिले कारण :
हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यातील दरवाजांचे बांधकाम आणि कोरीव काम हे हिंदू मंदिर असल्याची पुष्टी करतात, असा गुप्ता यांचा दावा आहे. दर्ग्याला असलेल्या दरवाजाची रचना हिंदू मंदिरांच्या दरवाजांसारखी आहे. या कोरीव कामांवरून येथे हिंदू मंदिर असावे असा अंदाज बांधण्यात येत आहे.
दुसरे कारण :
अशातच याप्रकरणी गुप्ता यांनी दिलेला दुसरा पुरावा म्हणजे दुर्ग्याच्या वरील भागात दिसत असलेली रचना होय. दर्ग्याच्या वरील भागांमध्ये हिंदू मंदिरांच्या अवशेषानुसार बांधकाम दिसते. काही वस्तूही दिसत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. हे एका प्रकारे मंदिराचा एक घुमट असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. हया काही अवषेशानुसार पूर्वीपासूनचे मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तिसरे कारण :
या दर्ग्यातील दाव्याचा तिसरा अंदाज म्हणजे पाणी आणि धबधबे. गुप्ता सांगतात की, जिथे शिवमंदिर आहे तिथे नक्कीच पाणी आणि झरे आहेत. या दर्ग्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथे हिंदू मंदिर असल्याचा दावा नाकारता येणार नाही. शिवाय त्यांनी आपल्या या याचिकेमध्ये हरबिलास शारदा यांच्या 'अजमेर : हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह' या पुस्तकातही याचा संदर्भ देण्यात आला आहे.
दरम्यान, गुप्ता यांनी केलेल्या दाव्याप्रकरणी सांगितले की, मोईनुद्दीन दर्गा असलेल्या ठिकाणी पूर्वी हिंदू मंदिर होते असे म्हटले. या पुस्तकात एक हिंदू जोडपे राहत असल्याचा दावा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तेच जोडपे महादेवाच्या मंदिराची पूजा करत असल्याचा दावा शारदा यांनी एका पुस्तकामध्ये १९११ मध्ये लिहिले होते.
कोण आहेत हरबिलास शारदा?
हरबिलास शारदा ब्रिटीश भारतात न्यायाधीश होत्या. १८९२ मध्ये त्यांनी अजमेरच्या न्यायिक विभागात उप न्यायाधीश म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. १८९४ मध्ये त्यांना अजमेर नगरपालिकेचे महापालिकेचे आयुक्त करण्यात आले होते. त्यानंतर १९०२ साली त्यांनी अजमेर-मेरवाडा येथे सत्र न्यायाधीश म्हणून काम केले. १९२५ मध्ये शारदा जोधपूर उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश झाल्या आहेत.
विष्णू गुप्ता यांचे वकील रामस्वरूप बिश्नोई यांनी सांगितले की, दिवाणी न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीस मान्यता दिली आहे.