धक्कादायक! संभळ मधील दंगलीचे महिलेकडून समर्थन

    28-Nov-2024
Total Views |

sambhal woman

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभळ येथे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीत. पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव यामध्ये जखमी झाले. मशिदीलगतच्या घरावरून दगडफेक करण्यात आली. पोलिसांवर गोळीबार करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. अशातच, आता एका मुलीची व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने या घटनेचे चक्क सर्मथन केले आहे, तसेच पोलिसांवर झालेली दगडफेक ही मामुली गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

संभळ मध्ये झालेल्या घटनेचे वार्तांकन करीत असता, एका मुस्लीम महिलेशी संवाद साधण्यात आला. यामध्ये तिला जखमी झालेल्या पोलिसांबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती नसल्याचे दिसून येत आहे. यात तिने म्हटले "दुखापत झाली असेल तर बरी होईल, त्यात काय ? जो गेला तो या जगातून गेला. तो परत येणार नाही.” सदर घटनेचे संपूर्ण वार्तांकन हे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यांवर दगडफेकीच्या खुणा दिसत आहेत. काही मोठाले दगडं रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले आहेत. अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली, जी आजही तेथे उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.घरासमोर दोन लोक बसलेले दिसले, जे मीडियाच्या विरोधात बोलत होते. एका मुस्लिम महिलेने या बद्दला सांगितले की " मशिदीजवळ सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली तसे लगेच आम्ही एकत्र घराबाहेर पडलो." सदर भागात पोलिस तैनात असून संभळ मधील परिस्थीती अद्याप निवळली नाही.