नवी दिल्ली : कलिंग विद्यापीठा(केआयआयटी)ने टाईम्स हायर एज्युकेशन इंटरडिसिप्लिनरी सायन्स रँकिंग २०२५ मध्ये मोठी भरारी घेतली आहे. भारतामधील प्रभावी विद्यापीठांमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली असून कलिंग विद्यापीठाला उत्कृष्ट विद्यापीठाची मान्यता यातून मिळाली आहे. विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील पहिल्या १०० विद्यापीठांपैकी कलिंग विद्यापीठ एक आहे.
दरम्यान, जागतिक स्तरावरील उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये कलिंग विद्यापीठ ९२व्या क्रमांकावर असून नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत भारताचे प्रतिनिधित्व भक्कम झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे अण्णा विद्यापीठ भारतीय संस्थांमध्ये आघाडीवर असून जागतिक स्तरावर ४१वे स्थान मिळविले आहे. भारतीय संस्थांमध्ये, केआयआयटी ही सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. केआयआयटी जागतिक आंतरविद्याशाखीय विज्ञान लँडस्केपमध्ये देशाच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देते.
"आंतरविद्याशाखीय वैज्ञानिक संशोधन विद्यापीठांमधील केआयआयटीचे स्थान अनेक दशकांमधील संशोधन आणि विकासासाठी मोठे योगदान दर्शविते.", असे केआयआयटी संस्थापक डॉ. अच्युता सामंता म्हणाल्या. केवळ २७ वर्षे जुनी संस्था व २१ वर्षे जुनी विद्यापीठ मानली जात असूनही केआयआयटीमधील संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हा टप्पा गाठला आहे. त्यांच्या दर्जेदार संशोधन, नवकल्पना आणि कल्पकतेमुळे हे शक्य झाले आहे, असेही डॉ. सामंता यांनी सांगितले.