गोवा : गोवा पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तसेच, यावेळी ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटवत घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदीवडेकर यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा पुरस्कार पटकावला.
५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय फिचर पुरस्कारांच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा विभाग जाहिर केला असून त्यात मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मारलेली बाजी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रशस्तिपत्रक, ५ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे नवज्योत यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरुप आहे.