२००० रुपयांच्या बनावट नोटा शोधण्याचे प्रमाण तिप्पट; केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती
27-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : मागील काही वर्षांत ५०० आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचे चलन झपाट्याने वाढले आहे. २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या जवळपास चार पटीने वाढली आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लोकसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. तसेच, २०२०-२१ नंतर २ हजार रुपयांच्या बनावट नोटा शोधण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.
दरम्यान, ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ झाली असून दैनंदिन व्यवहारात ५०० रुपयांची नोट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. वाढत्या मागणीमुळे बनावट नोटांचा ट्रेंडही वाढला असून २०१८-१९ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २१,८६५ इतकी होती, असे केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. तथापि, २०२३-२४ मध्ये किंचित घट होऊन ८५,७११ वर आले.
२ हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्येही वाढ झाली आहे. २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत २ हजारांच्या बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. या आकडेवारीमुळे बनावट नोटांच्या वाढत्या चलनाबाबत सरकार आणि जनतेमध्ये चिंता वाढली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत यावर उत्तर देताना बनावट नोटा रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. बनावट नोटांवर सरकार सातत्याने कठोर कारवाई करत असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.