‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्र सरकारची देशातील संशोधक विद्यार्थ्यांना भेट
27-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ ( ONOS ) या योजनेला मंजुरी दिली असून त्याचा फायदा देशातील अनेक विद्यापीठे, महाविद्यालयांना होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
केंद्र सरकारने देशात ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरवले असून या योजनेला मंत्रिमंडळानेदेखील मंजुरी दिली आहे. देशात अनेक ठिकाणी संशोधने सुरू असतात. ही संशोधने काही जर्नलमधून प्रकाशित केली जातात. मात्र, देशातील प्रत्येक विद्यापीठ अथवा महाविद्यालयातील संशोधन करणार्या विद्यार्थ्यांपर्यंत संशोधनातील ही प्रगती पोहोचतेच, असे नाही. त्यामुळे संशोधनाला गती देण्यासाठी तसेच संशोधनाचा देशात सर्वदूर प्रसार करण्यासाठी ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ योजनेची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.