इंडी आघाडीच्या विजयानंतर झारखंडमध्ये कट्टरपंथींचा उन्माद!

    27-Nov-2024
Total Views |

Jharkhand
 
साहिबगंज : (Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
 
संबंधित घटना साहिबगंज जिल्ह्यातील रंगा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. मोहम्मदपूर गावातील इमाम मिर्झा यांनी रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, निकाल जाहीर झाल्यापासून भाजपला मतदान केल्यामुळे मेहबूब शेख, मजहरुल शेख, मुन्ना शेख, मुस्तफा शेख आणि आशिक रोख यांचे मोहब्बतपूर येथील शमीम शेख त्यांचा मानसिक छळ करत होते.
 
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले. आरोपीने धमकावले की, "तुम्ही कमळाला मतदान केल्यामुळे आम्ही तुम्हाला गावातून हाकलवून देऊ. तुम्हाला मारून अशा ठिकाणी फेकून देऊ की, तुमचं नामोनिशाणसुद्धा राहणार नाही. तुम्हाला आमचं काहीही बिघडवता येणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस स्टेशनपर्यंत सगळं आमच्या ताब्यात आहेत."
 
निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजप उमेदवाराने पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. पीडितेच्या घरावरही दगडफेक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन जण जखमी झाले. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्याने साहिबगंज पोलिसांकडे केली आहे. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनीही या घटनेचा उल्लेख करत संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले.