महाराष्ट्राचा कौल विकासालाच; ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या नव्या सरकारला शुभेच्छा
26-Nov-2024
Total Views |
पुणे : “महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने वाटते,” असे सांगत ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार ( Dr. Dhananjay Datar ) यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
“कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते,” असे ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना म्हणाले आहे. “केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.” असे ते पुढे म्हणाले. “महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पाऊले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यांतील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यांपैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल,” असा विश्वास धनंजय दातार यांनी व्यक्त केला आहे.