नवी मुंबई, दि.२६ : विशेष प्रतिनिधी सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून एक महिन्याच्या कालावधीत ९२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसही ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सिडको प्राधिकरणाने दिली आहे.
सिडकोतर्फे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन सदर योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता २६,००० सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. परवडणाऱ्या दरासह परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी या गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.
परवडणाऱ्या दरासह परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी या गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेसही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आजपर्यंत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता येऊन त्यांचे घराचे स्वप्न साकार व्हावे याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.
तसेच ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे. तसेच रु. 100/- किंवा रु. 500/- मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र/वचनपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. अर्जदारांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र/वचनपत्र सादर करता येणार आहे. या गृहनिर्माण योजनेद्वारे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी सुसज्ज शहरामध्ये घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना लाभली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी आपले घराचे स्वप्न साकार करण्यासाठी योजनेकरिता अर्ज करावा.