राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची पुन्हा नियूक्ती!
26-Nov-2024
Total Views |
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियूक्ती करण्यात आली आहे. त्या लवकरच आपला पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्यात आले होते.
निवडणूकीच्या अनुशंगाने विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्लांच्या बदलीची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांचा कार्यभार संजय कुमार वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, आता निवडणूकीनंतर पुन्हा एकदा रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी नियूक्ती करण्यात आली आहे.