बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

    25-Nov-2024
Total Views |
Baba Siddiqui

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या २६ वर्षांच्या आरोपीला अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून, त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुमितच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता २६ झाली आहे.

बाबा सिद्दिकी हत्येनंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत २६ आरोपींना अटक केली असून त्यापैकी तीन आरोपी पोलीस, तर इतर २२ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत सुमित वाघ यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले होते. या पथकाने अकोला येथून सुमितला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.