ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात ५१ जागांवर थेट लढाई

    24-Nov-2024
Total Views |
Shinde

शिवसेना पक्षफुटीपासून सुरू झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना, आमचा पक्ष हाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे असा दावा करत होते. या वादावर विधानसभा निवडणुकीद्वारे उत्तर मिळेल असे बोलले जात होते. राज्यात ५१ मतदारसंघात शिवसेना (शिंदे) ( Shinde ) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) असा सामना रंगला.

या ५१ मतदारसंघातील मतदार खर्‍या शिवसेनेबाबतचा निर्णय घेतील असे बोलले जात होते. अखेर जनतेने त्यांचा कौल दिला आहे. निवडणुकीच्या निकालांनुसार शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे समोर आले आहे. कारण या ५१ पैकी बहुसंख्य जागांवर शिंदेंचे उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रमुख लढती

कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (विजयी), केदार दीघे

ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (विजयी), नरेश मनेरा

सिल्लोड - सुरेश बनकर (विजयी), अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट (विजयी), राजू शिंदे

मागाठाणे - प्रकाश सुर्वे (विजयी), उदेश पाटेकर

भांडुप पश्चिम - अशोक पाटील (विजयी), रमेश कोरगावकर

पालघर - राजेंद्र गावित (विजयी), जयेंद्र दुबळा

कन्नड - संजना जाधव (विजयी), उदयसिंह राजपूत

दिंडोशी - सुनिल प्रभू (विजयी), संजय निरुपम

जोगेश्वरी पूर्व - अनंत नर (विजयी), मनिषा वायकर