मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. यामध्येच आता ठाणे विधानसभेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर आघाडी वर असल्याचे दिसून आले आहे. चौथ्या फेरीच्या अंती हा निकाल समोर आला असल्याचे बोलले जात आहे.
उबाठा गटाचे राजन विचारे दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव जे निवडणुकीच्या रिंगणात होते, ते तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. राज्याचे एकूण चित्र महायुतीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे, त्याच बरोबर महाविकास आघाडी यांच्यातील, संघर्षामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो आहे अशी चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.