विखेपाटलांनी राखला गड! ७० हजारांच्या लीडने काँग्रेसचा पराभव

    23-Nov-2024
Total Views |

shirdi
 
अहिल्यानगर : (Shirdi Assembly Constituency Result 2024)राज्यातील लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर समोर आला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखेपाटील यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांचा ७० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
 
शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे रिंगणात होत्या. तर भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या तिरंगी लढतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय संपादन केला आहे.
 
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग सात वेळा शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राधाकृष्ण विखे पाटील ११९५ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले, तेव्हापासून ते आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघात विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. पण २०१९ च्या निवडणूक काळात विखे पाटलानी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभेवर निवडूनही आले.