मुंबई : (Mahayuti) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचा महानिकाल जाहीर होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
शनिवार दि. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात सगळं चित्र स्पष्ट होईल. समोर आलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या पहिल्या तासाभरातच महायुतीने दीडशेचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीने तब्बल १५३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी १२२ जागांवर पुढे आहे. तसेच अपक्षांच्या खात्यात १० पेक्षा जास्त जागा जाताना दिसत आहे.