घराणेशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय - आशिष शेलार

    23-Nov-2024
Total Views |
Ashish Shelar


मुंबई : (Ashish Shelar) लोकसभेला आम्हाला ३ हजारांची आघाडी होती. पण, आता जवळपास २० हजारांच्या मताधिक्याने आम्ही जिंकलो. वांद्रे, खार आणि सांताक्रुझमधील जनतेचा हा विजय आहे. घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढत होती. एका बाजुला लोकशाहीच्या रक्षणार्थ उभा ठाकलेला मी एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता होतो, तर दुसरीकडे झकेरीया आणि दत्त कुटुंबीयांचे वारसदार. पण, वांद्रे पश्चिम मतदारसंघातील जनतेने घराणेशाहीला झिडकारत लोकशाहीला कौल दिला. मला तिसऱ्यांदा विजयी केले. त्यासाठी मतदारांचे आभार. हा विजय मतदारांचा आहे.

अॅड. आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष