रायगड : (Aditi Tatkare) राज्यातील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा पराभव करुन दमदार विजय मिळवला आहे. याशिवाय राजेंद्र ठाकूर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही श्रीवर्धनमधून अदिती तटकरे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक जिंकून यशाला गवसणी घातली आहे.