“महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे,” असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विधान होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला असता, तर देशाच्या वर्मावर घाव बसला असता व देशावर गिधाडांचे राज्य येण्याचा ग्रहणकाळ सुरू झाला असता. महाराष्ट्राचा विजय हा यासाठी महत्त्वाचा आहे. या संपूर्ण लढाईत देवेंद्र फडणवीस जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच भाजप व संघ परिवाराचे कार्यकर्ते अभिनंदनास पात्र आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणाला अनोखी कलाटणी देत महाराष्ट्राच्या जनतेने आपला कौल सुस्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार्या महायुतीच्या पारड्यात टाकला. हा विजय जितका मोठा आहे, प्रभावी आहे, सुस्पष्ट आहे, तितकाच तो गंभीर आहे, खोल आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या त्याग, निष्ठा आणि संयमाचादेखील आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला अनोखी कलाटणी देत महाराष्ट्राच्या जनतेने आपला कौल सुस्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार्या महायुतीच्या पारड्यात टाकला. हा विजय जितका मोठा आहे, प्रभावी आहे, सुस्पष्ट आहे, तितकाच तो गंभीर आहे, खोल आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या त्याग, निष्ठा आणि संयमाचादेखील आहे. २०१४ साली १२२ आमदार घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. बहुमत गाठण्यासाठी सोबत आली, ती उद्धव ठाकरेंची शिवसेना. सतत सवत्यासुभ्याने वागणारी शिवसेना सत्तेत होती. उद्धव ठाकरेंना बाहेरून बहकवणारे शरद पवार होते आणि सत्तेत राहून उद्धव ठाकरेंनामुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा दाखविणारे संजय राऊतही होते.
२०१९ साली महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत भाजपच्या जागा वितभर कमी झाल्या आणि इतकी वर्षे ‘सहयोगी’ म्हणविणार्यांचे शिवसेनेचे खरे रुप बाहेर आले. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंच्या हाती हा खंजीर शरद पवारांनी काँग्रेसच्या हाताने दिला होता. नंतर जो काही तमाशा चालला, तो आज पुन्हा सांगण्याची गरज नाही. पुढचे राजकीय नाट्यदेखील सर्वश्रुत आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने एकनाथ शिंदेंना सोबत घेतले, सन्मानाने मुख्यमंत्रिपद दिलेच, पण त्यांच्या सहकार्यांना कॅबिनेटमंत्रिपदेही बहाल केली.
शिदेंचा कार्यकाळ कोणताही दबाव न आणता, कोणतीही भीती न दाखवता पूर्ण करू दिला. देवेंद्र फडणवीस सदैव एकनाथ शिंदे हेच या सरकारचे प्रमुख आहेत, असे वारंवार सांगत राहिले. एकनाथ शिंदेंच्या वाचाळ सहकार्यांनी केलेल्या बर्या-वाईट गोष्टींची जबाबदारीही ते घेत राहिले. दुसर्या बाजूला मात्र अखंड अथकपणे फडणवीसांविरोधात कटकारस्थाने सुरूच होती. कधी त्यांच्या जातीवरून त्यांना लक्ष्य केले गेले, तर कधी त्यांच्या शारीरिक वजनावरून, तर कधी त्यांच्या संयमालाही अगतिकता मानून टीका केली गेली. कन्हैय्याकुमारसारख्या चिरकुट माणसाने राजकारणातील शुुचितेचा निकष सोडून त्यांच्या पत्नीवरही टीका केली. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी तक्रारीचा चकार सूर काढला नाही. शांतपणे ते आपले काम करीत राहिले.
सत्ताकारणाच्या राजकारणात असे लहान लहान चढउतारसुद्धा व्यक्तीच्या राजकारणाचा भविष्यवेध घेतात. इथे मात्र फडणवीस त्याला पूर्णपणे अपवाद ठरले. त्यांच्या पक्ष आणि विचारसरणीवरच्या निष्ठा अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अक्षुण्ण राहिल्या. पक्षासाठी त्यांनी केलेला त्याग हा पक्षाला या ठिकाणी घेऊन आला आहे. परमेश्वराने दिलेली अफाट बुद्धिमत्ता, आखलेली योजना अमलात आणण्याची अंगभूत क्षमता आणि दीर्घकालीन योजनांची सफलता पाहण्यासाठी त्यांच्यापाशी असलेला संयम, या त्यांच्या गुणांनी आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
ही निवडणूक आकलनासाठीदेखील अवघड होती. कारण, महाभारताच्या युद्धाप्रमाणे या निवडणुकीला धर्मयुद्धाचे स्वरुप आले होते. धर्मांधांनी फतवे काढले, धर्मांधांच्या मतांसाठी लाचारी करणार्यांनी गोल टोप्या घालायचे, सुंता करून घ्यायचे व घरातल्या महिलांना बुरखा घालायचे बाकी ठेवले होते. अशाप्रकारे निवडणूक महाराष्ट्राने कधीच पाहिली नव्हती. भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांना संपूर्ण सहकार्य केले. मनसेसारख्या पक्षालाही खर्या अर्थाने मैत्रीपूर्ण लढतीचा संपूर्ण लाभ मिळू दिला. ‘यतो धर्मस्ततो जय:’ या उक्तीप्रमाणे हा विजय आहे. राजकीय बेरकीपणाने या निकालाचे विश्लेषण करायचे ठरविले, तर महाराष्ट्राची जनता किती हुशार आहे, ते आपल्या लक्षात येईल. सत्ता ही मजेशीर गोष्ट आहे. भल्याभल्यांना ती उन्मत्त करते. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश हा कुठल्याही सहयोगी पक्षाला परस्परांवर कुरघोड्या करून भाजपवर कधीही दबाव टाकता येणार नाही, असा दिलेला आहे.
या विजयामागे अजूनही काही घटकांचा विचार काळजीपूर्वक करणे व समजून घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाजपला संघटनात्मक ढाँचा देणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे. रा. स्व. संघ व सहयोगी संस्थांनी ही निवडणूक यंदा अत्यंत गांभीर्याने घेतली. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ मानून लोकसभेला पूर्णपणे मतदानासाठी बाहेर पडणारा हिंदुत्ववादी मतदार राज्य, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था असे उतरत्या क्रमाने मतदान करतो. याचा फायदा काँग्रेस, अल्पसंख्याकांच्या जीवावर जगणारे पक्ष, खुद्द अल्पसंख्याक राजकीय नेते यांना मिळतोे. हे सत्य महाराष्ट्रातील संघ परिवाराला लोकसभेच्या निवडणुकीनंतर उमगले. हिंदुत्वाचे रक्षण घटनादत्त मार्गाने, लोकशाही पद्धतीने करायचे असेल, तर मतदान हाच त्याचा राजमार्ग आहे. शतप्रतिशत मतदान घडवून आणण्यासाठी रा. स्व. संघ व त्याच्या सहयोगी संघटनांनी यावेळी अपार कष्ट उपसले.
शिवछत्रपतींच्या स्वराज्याला साधुसंतांचा आशीर्वाद होता, तसे आधुनिक संतमहंतदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या अनुयायांना व सर्वसामान्य सश्रद्ध हिंदूंना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. लोकशाही मार्गाने तयार केला गेलेला हा दबावगट इतका प्रभावी होता की, राजकीय पोंगापंडितांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या आक्षेपांचा प्रत्यक्ष मतदानावर काडीमात्र फरक पडला नाही. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतलेला हिंदूंच्या रक्षणाचा थेट पवित्रा त्याच्या कोअर मतदाराला मनापासून भावला. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार ना ‘कटला’, ना ‘बटला!’ रा. स्व. संघाच्या चिंतनात ज्या सज्जनशक्तीचा उल्लेख वारंवार होत असतो, त्या सज्जनशक्तीने स्वत:चा सात्विक आणि मंगल प्रभाव या निवडणुकीत दाखवून दिला. ज्या घटकांची भीती निवडणुकांपूर्वी वाटत होती, ते सगळेच घटक व त्याच्या जोडगोळ्या निष्प्रभ ठरल्या. मराठी मतदाराने खणखणीतपणे भारतीय जनता पक्ष व सहयोगी पक्षांना साथ दिली. धर्मांधांचे जे ताबूत निवडणुकांपूर्वी नाचवले गेले, त्याला लोकशाही मार्गाने हिंदू मतदारांनी धूळ चारली.
लोकसभेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप-महायुतीला चांगले यश मिळू शकले नाही. एखाद्या धडधाकट बलवान प्राण्याला थोडेसे जायबंदी झालेले पाहून गिधाडांच्या आशा जशा पल्लवित होतात, तशा आशा शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या झाल्या होत्या. पवारांच्या कारस्थानाला ऊत आला होता, तर संजय राऊतांच्या तोंडाचे गटार असे काही फुटले होते, की त्यात त्यांचा स्वत:चा पक्षच वाहून गेला. मुख्यमंत्रिपदाची आस लावलेल्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा विधान परिषदेवरही निवडून जाता येईल, असे संख्याबळदेखील त्यांच्याकडे उरलेले नाही. गोवा काँग्रेसचा कित्ता गिरवत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडून आलेले आजचे आमदार त्यांना उद्या सोडून पळून गेले, तर आश्चर्य वाटू नये. कारण, असल्या लोकांच्या पक्षात राजकीय भवितव्य हे फक्त त्यांच्या घरात जन्मलेल्या पोराटोरांचेच असते. महाराष्ट्रात सत्तेत येऊन महाराष्ट्राच्या तिजोरीला भोकं पाडून देशाची निवडणूक लढविण्यासाठी पैसा उभा करण्याच्या कुटिल योजना या मंडळींकडून आखल्या गेल्या होत्या.
आजच्या या जनादेशाने या विघ्नसंतोषी मंडळींना चांगलाच तडाखा दिला आहे. हा विजय सोपा नाही. महाराष्ट्रातल्या एका प्रदीर्घ काळ चालणार्या राजकीय परिवर्तनाची ही सुरुवात आहे. ‘धर्मयुद्ध विरुद्ध जिहाद’ या लढाईत धर्म वरचढ ठरला आहे. कोणत्याही भव्य विजयासाठी, त्या विजयासाठी तयार झालेले मन व मानसिकता लागते. त्यासाठी सर्वप्रथम स्वत:मध्ये परिवर्तन करून घ्यावे लागते. लोकसभेच्या विजयानंतर नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर ते बदल सहज लक्षात येतात. ज्यांमध्ये कोणत्याही वळणावर स्वत:मध्ये बदल घडविण्याची क्षमता असते, अशीच माणसे परिस्थितीत परिवर्तन घडवून आणू शकतात. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराने असे परिवर्तन आज घडवून आणले आहे. “महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे,” असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विधान होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला असता, तर देशाच्या वर्मावर घाव बसला असता व देशावर गिधाडांचे राज्य येण्याचा ग्रहणकाळ सुरू झाला असता. महाराष्ट्राचा विजय हा यासाठी महत्त्वाचा आहे. या संपूर्ण लढाईत देवेंद्र फडणवीस जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच भाजप व संघ परिवाराचे कायर्र्कर्तेही अभिनंदनास पात्र आहेत.
अधिक सक्षम, चांगल्या संख्याबळासह महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तारूढ झाले आहे. लाडकी बहीण, शेतकरी या सगळ्यांना थेट खात्यावर मदत करण्याचा ‘मध्य प्रदेश पॅटर्न’ महाराष्ट्राने अनुसरला. महाराष्ट्राची अर्थघडी विस्कटण्याची कोल्हेकुई विरोधकांनी सुरू केली आहे, ती यापुढेही अशीच सुरु राहील. निवडणुकांच्या गदारोळात ‘थिंक बँक’ या लोकप्रिय युट्यूब चॅनलचे प्रमुख विनायक पाचलग यांना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राबाबतचे त्यांचे ‘व्हिजन’ विशद करणारी तपशीलवार मुलाखत दिली आहे. सरकारी योजना व कंत्राटदार नेमून लोककल्याणाचे काम करायचे, की लोकांच्या खात्यावर थेट पैसे जमा करून आपला उत्कर्ष साधण्याचे स्वातंत्र्य लोकांनाच द्यायचे, असा हा तात्विक पेच आहे. या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, देशाचे अर्थचक्र चालविणारा महाराष्ट्र सधन, समृद्ध आणि स्वयंपूर्ण करणे, हेच महायुतीचे पुढच्या काळातील आव्हान असेल. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व दिल्लीत मोदी असल्यामुळे ‘मुमकीन हैं’ असे मानायला हरकत नाही!