गड राखत प्रशांत ठाकूर यांचा विजयी चौकार!

    23-Nov-2024
Total Views |
 
 
Prashant Thakur
 
रायगड : पनवेल विधानसभा मतदारसंघात गेले तीन टर्म विजयाची हॅट्रिक मारणारे पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी चौकार मारला आहे. सलग चौथ्यांदा विजय मिळवत त्यांनी आपला पनवेलचा गड राखला आहे. प्रशांत ठाकूर यांनी अंतिम मतमोजणीच्या लढतीत १ लाख ८३ हजार ९३१ मते मिळवत विरोधकांवर ५१ हजार ०९१ मतांनी विजयी मिळवला आहे.
 
तर दुसरीक़डे बाळाराम पाटील यांना अंतिम फेरीच्या मतमोजणीपर्यंत १ लाख ३२ हजार ८४० मते मिळवली आहेत. तर तिसऱ्या बाजूला लीना गरड यांनी चांगली टक्कर देत ४३ हजार ९८९ मते मिळवली आहेत.
 
प्रशांत ठाकूर यांचा पराभव करण्यासाठी पनवेल मतदारसंघात निवडणुकीआधी राजकीय नाट्य दिसून आले होते. प्रशांत ठाकूर यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली होती. महाविकास आघाडीने उबाठा गटातून मराठा समाजाच्या मतांची गोळाबेरीज करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांची व्होट बँक असणाऱ्या पनवेल येथून लीना गरड यांना निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली. तर दुसऱ्या बाजूला शेकापचे बाळाराम पाटील यांचे खटारा चिन्ह गोठवत त्यांनी शिट्टी या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास सांगितली. पनवेलच्या ग्रामीण भागांमध्ये शिट्टीचा जोर कायम होता. अनेक मुस्लिम मतदारांनी शिट्टी चिन्हाला मत दिल्याचे सर्वेक्षणातून आणि अंदाजावरून तर्क लावण्यात आले.
 
मात्र पनवेल विधानसभा मतदारसंघातील काही शहरी भागांतील खारघर आणि पनवेल येथून प्रशांत ठाकूर यांना चांगली मते मिळाली आहेत असे चित्र आहे. एकूण २७ मतमोजणीच्या फेऱ्यांचा विचार केल्यास प्रशांत ठाकूर यांनी ११ फेरीपासून ते अंतिम २७ व्या फेरीपर्यंत आघा़डी कायम ठेवत विजय मिळवला आहे.