हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा डंका! स्नेहा दुबे पंडित विजयी
23-Nov-2024
Total Views |
मुंबई : वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर पराभूत झाले असून भाजपच्या स्नेहा दुबे पंडित विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
वसईत यंदा भाजप, काँग्रेस आणि बविआ अशी तिरंगी लढत होती. भाजपकडून स्नेहा दुबे पंडित, काँग्रेसचे विजय पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर रिंगणात होते. हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघात सलग दोनदा विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा ते हॅट्रिक करणार की, भाजप किंवा काँग्रेस बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी ७७ हजार २७९ मते घेत विजय मिळवला आहे. तर हितेंद्र ठाकूर दुसऱ्या आणि विजय पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
काही दिवसांपूर्वी हितेंद्र ठाकूर चांगलेच चर्चेत आले होते. हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विरामधील विवांत हॉटेलमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. मात्र, तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले.