"लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना छप्पर फाड के झाडू लागाके निवडून दिले"
देवाभाऊने मानले लाडक्या बहिणींचे आभार
23-Nov-2024
Total Views |
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी दि: २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाईव्ह येत त्यांनी मतदारांना मुंबई येथे संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी "लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना छप्पर फाड के झाडू लागाके निवडून दिले", असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
भारत माता की म्हणत उपस्थितांना संबोधित केले आहे. त्यानंतर त्यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत त्यांना वंदन केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, राज्यातील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुतील भरभरून मतं दिलेली आहेत. त्या जनतेचे मनापासून आभारी आहोत. या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत घालतो. सर्व एकत्र येऊन आम्ही एक राहिलो.
या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना निवडून दिले की, छप्पर फाड के झाडू लागाके निवडून दिले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी फेक नॅरेटिव्हवर भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. मात्र हा फेक नॅरिटिव्ह शेतकऱ्यांनी धुडकावून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एक है तौ सेफ है असा संदेश दिला होता. जर आपण वाटले गेलो तर काहींनी आपल्यावर राज्य केले असते. त्यामुळे आपल्याला एक रहावे लागेल, असा संदेश मोदींनी दिला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्व मतदारांनी एक है तो सेफ है! असा नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा सर्वांनी ऐकला. त्यांनाही माहिती होते की महायुती है तौ सेफ है! याठिकाणी तुष्टीकरण दिले जात होते, तसेच व्होट जिहादचे नारे दिला जात होते. एका विशिष्ट समाजाला वेगळे करून मतांमध्ये फूट पाडून आपण निवडणुका जिंकू अशी वल्गना केली जात होती. हा महाराष्ट्र असून या राज्यात विविध परंपरा आहे. महानुभव पंथांची, वारकरी संप्रदाय, वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्यांनी एकत्रितपणे सांगितले त्यांनी गावा-गावांत जात मतदानाविषयी जागृती केली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच अनुसुचित जाती-जमातीतील समाजाला संविधान बदलण्याचा फेक नॅरेटिव्ह दाखवण्यात आला होता. भारताचे संविधान देशभरात लागू करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.