अमेरिकेसह २८ देश फिरलो पण दर्दी माहौल भारतातच

22 Nov 2024 19:02:05
Aditya Oak

ठाणे : हार्मोनियम वादनासाठी अमेरिकेत २७ वाऱ्या झाल्या, तेथील ७८ शहरे बघितली. असे २८ देश फिरून झाले, मात्र आपल्या देशातील दर्दी माहोलमध्ये परफॉर्म करणे प्रचंड आवडते. असे प्रतिपादन हार्मोनियम वादक आदित्य ओक ( Aditya Oak ) यांनी केले.

ठाण्यातील ज्ञानराज सभागृहात नुकताच हार्मोनियम वादक आदित्य ओक यांच्या बरोबर ग - गप्पांचा या कार्यक्रमात एक अनौपचारिक मैफल पार पडली. नांदीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात ओक यांनी, पायपेटी, हातपेटी आणि पुढे अनेक बदल होत गेलेल्या हार्मोनियम आणि ऑर्गनची महती सांगितली. तसेच, ओक घराण्याच्या दोन पिढ्या अगदी आजी आजोबा यांच्या पिढीपासून सुरेश वाडकर, राहूल देशपांडे, आशा भोसले, परवीन सुलताना अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ केलेल्या हार्मोनियम वादनाच्या आठवणी जागवल्या.

हार्मोनियम वाढनासाठी तरुण वयात त्यांनी केलेल्या परदेशी दौऱ्याची माहिती देताना, सुरुवातीच्या काळात ८७ दिवसात ४४ कार्यक्रम केल्याचे सांगितले. ते स्वतः, राहुल देशपांडे आणि आणखीन एक मित्र अशा तिघांनी मिळून
आत्तापर्यंत त्यांच्या अमेरिकेत २७ वाऱ्या झाल्या, तेथील ७८ शहरे बघितली आहेत. असे २८ देश फिरून झाले. पण आपल्या देशातील दर्दी माहोलमध्ये परफॉर्म करणे प्रचंड आवडत असल्याचे सांगितले.

Powered By Sangraha 9.0