बरहानपूर : मध्य प्रदेशातील बरहानपूर येथील बाबा नवनाथांच्या समाधीवर काही कट्टरपंथींनी दगडफेक केली. यामुळे हिंसाचाराला पाठबळ मिळाले असून गोळीबारही करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र आता हिंदूंनी याप्रकरणी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नवनाथ महाराज यांच्या समाधीवर कब्जा करणाऱ्यांना हिंदूंनी आरसा दाखवत कट्टरपंथींचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी धर्मांधांकडून कोणताही संशयास्पद हेतू कधीही यशस्वी होऊ देऊ नये असा ठाम विश्वास मध्य प्रदेश भाजपने दिला आहे.
हिंदूंचे म्हणणे आहे की, बाबा नवनाथ यांच्या समाधीवर कट्टरपंथींनी दावा केला. यावेळी या समाधीला हिंदूंनी भगवा रंग दिला. त्यानंतर काही कट्टरपंथींनी पोलिसांत जाऊन तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सुरू असलेली संवेदनशील परिस्थिती हाताळली. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली होती. यानंतर आता अतिरिक्त पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान, याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हाणामारीत एकूण ४ जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नजीकच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.