नवी मुंबई विमानतळ नजीक असलेल्या अवैध दर्ग्यावर सिडकोचा हातोडा

22 Nov 2024 18:29:06

illegal Mosque
 
पनवेल : नवी मुंबई विमानतळ येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या पारगाव येथील डोंगराळ ठिकाणी अवैध दर्गा (Illegal Mosque) बांधण्यात आला होता. विमानतळाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याने सिडकोने या अवैध दर्ग्यावर जेसीबी चढवत दर्गा जमीनदोस्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दर्ग्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. फुल पीर शाह बाबा दर्गा असे या दर्ग्याचे नाव आहे.
 
या अवैध दर्ग्यामुळे विमानतळास मोठा धोका असल्याची माहिती काही हिंदूंनी दिली होती. पोलिसांनी गुरूवारी २१ नोव्हेंबर रोजी दर्गा पाडण्यास आदेश दिला. त्यानंतर दर्गा पाडण्यास सुरूवात झाली आहे. याप्रकरणी आता हिंदू जनजागृती समितीचे सुनिल घनवट यांनी सोशल मीडियावर अवैध दर्गा जमीनदोस्त केल्याबद्दल अभिनंदन करत सिडकोचे आभार मानले आहेत.
 
ते म्हणाले की, सध्या विमानतळाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. याच विमानतळाठिकाणी असलेला दर्गा हा विमानतळाच्या दृष्टीने धोकादायक आहे. सिडकोने या दर्ग्यावर अॅक्शन घेतल्याने सुनिल घनवट यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. २०१२ पासून संबंधित दर्गा हा अवैध होता. याप्रकरणाची माहिती शासन प्रशानाने जाणून घेत त्यावर पाऊल उचलले आहे. २०२३ पासून याप्रकरणी अनेक तक्रारी येत होत्या, असे सुनिल घनवट म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, प्रतापगडावर अफजल खानाच्या कबरीवर स्थानिक प्रशासनाने त्यावर कारवाई करत अॅक्शन घेतली. त्यानंतर नवी मुंबई विमानतळनजीक असलेल्या दर्ग्यावर सिडको प्रशासनाने कारवाई करत मोठे पाऊल उचलले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0