नाना पटोले मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार! अशोक चव्हाण यांची टीका

22 Nov 2024 12:24:50
 
Patole
 
नांदेड : नाना पटोले मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आहे. ते कधीच शक्य होणार नाही, अशी टीका भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचे सरकार बनणार असल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी केले होते. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
 
अशोक चव्हाण म्हणाले की, "नाना पटोले मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आहे. कारण शेवटी महायूतीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणे शक्य होणार नाही," असा दावा त्यांनी केला.
 
 हे वाचलंत का? - नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ! कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली
 
मुख्यमंत्रीपदावरून मविआत घमासान!
 
दरम्यान, गुरुवारी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचे सरकार बनणार आहे, असे सूचक विधान नाना पटोलेंनी केले. तर मी हे मानत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही महाविकास आघाडीचे सरकार बसून चर्चा करू, असे संजय राऊत म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0