खैबर पख्तूनख्वा : पाकिस्तानाच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरूवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अंदाजे ३८ लोक ठार झाली आहेत. या हल्ल्यामध्ये ३० हून अधिक लोक जखमी झाले होते. खैबरच्या कुर्रम भागात हा हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक करणाऱ्य़ा वाहनांची ताफ्याने परिसराचे लक्ष्य बनले गेले आहे.
या ताफ्यात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अनेक व्हॅन असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यावर आता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला होता. या हल्ल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी जखमी झालेल्यांना पेशावर आणि इतर ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या दहशतवादी हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे सोशल मीडियावर दावा करण्यात आला आहे की, हल्ल्यात प्रभावित असलेले लोकं शिया समुदायातील होते तर काही हल्लेखोर सुन्नी मुस्लिम होते. मात्र, या दाव्यांची अद्याप पुष्टी करण्यात आली नाही असे वृत्त आहे. २४ तासांत पाकिस्तानात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.
याआधी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. तेव्हा १२ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी ही इतर कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसून या हल्ल्याचा संशय हा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानावर वर्तवण्यात आला असल्याची शंका आहे.