लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करावे

20 Nov 2024 18:01:31
mangal prabhat lodha

मुंबई : मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले. प्रसंगी बोलताना त्यांनी प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक सेनापती आपले काम करतो आहे आणि माझ्याकडे मलबार हिल परिसराची जबाबदारी आहे व येथून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांनी 'एक है तो सेफ है’चा संदेश दिला आहे आणि आपण एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू हेच सत्य आहे. त्याच बरोबर त्यांनी सर्वांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. त्यांच्या आवाहनाला महाराष्ट्रात आणि मुंबईत नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. आज राज्यभर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वजण कार्य करत आहेत आणि त्या प्रमाणे मला देखील मलबार हिल परिसराची जबाबदारी दिलेली आहे आणि इथे चांगले मतदान होणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0