संभल : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील जामा मशिदीचा (Jama Masjid) वाद आता आणखी चिघळला आहे. अधिवक्ते विष्णू शंकर जैन यांनी जामा मशीद म्हणून ओळखले जाणाऱ्या क्षेत्रात हिंदू मंदिरे होती, १५२९ साली बाबरने पाडली असा दावा करण्यात आला. या संबंधित याचिकेत मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी संभळच्या जिल्हा न्यायालयाने मान्य केली असून याप्रकरणी वकिलांनी आयुक्तांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाचा निर्णय प्रसारित केल्याचा दावा त्यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे. हे ठिकाण प्राचीन काळातील हरिहर मंदिर म्हणून ओळखले जात होते. विष्णू शंकर म्हणाले की, बाबरने १५२९ साली मंदिर पाडून मशीद बांधली होती. या संबंधित पोस्टमध्ये त्यांनी हिंदूंच्या श्रद्धेचा उल्लेख करत म्हटले की, भगवान कल्की यांचा भविष्यात त्या ठिकाणी अवतार येईल असा विश्वास आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना विष्णू शंकर जैन यांनी बाबरला क्रूर म्हटले, यासंबंधित ऐतिहासिक पुरावे आणि हिंदू श्रद्धांच्या आधारे ही याचिका दाखल केली. त्यांनी याप्रकरणात उत्तर प्रदेश सरकार, भारत सरकार, पुरातत्व विभाग, संभलचे जिल्हा दंडाधिकारी आणि जामा मशीद समितीला पक्षकार बनवले. याचिकाकर्त्याने एएआय संरक्षित जागा असल्याचे मशीद म्हणून या जागेचा वापर करण्यावर आक्षेप घेतला. तसेच हरिहर मंजिराचा सध्या चुकीच्या पद्धतीने मशीद म्हणून वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याचिकेत त्यांनी न्यायालयात मागणी केली की, भारतीय नागरी प्रक्रिया संहिताच्या आदेश २६ च्या नियम ९ आणि १० अंतर्गत, वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण वकील आयुक्त नियुक्त करून केले जावे. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने सर्वेक्षणासाठी अॅ़डव्होकेट कमिशनरची नियुक्ती केली आहे.
न्यायालयाच्या या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे विष्णू शंकर जैन यांनी सांगितले आहे. वादग्रस्त जागेचा मशिदीसाठी वापर करण्याबाबत बंदी घालण्यात यावी, अशी विनंतीही कोणत्याही धार्मिक विवादाचे कारण बनू नये, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयानंतर ही बाब केवळ कायदेशीर नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवरील चर्चेचा विषय ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे.