सपाच्या अबु आजमी यांनी घेतली 'या' वादग्रस्त मौलवीची भेट

19 Nov 2024 19:25:27

abu azmi
 
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे लोकांमध्ये चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते अबु अझमी यांनी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुफ्ती सलमान अझरी या मौलवीची भेट घेतली. या भेटीदरम्यान ईशनिंदा विरोधी कायदा अस्तित्वात यावा या संबंधी दोघांमध्ये चर्चा झाली. बैठकीदरम्यान, समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि मुफ्ती अझरी यांनी प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.

मानखुर्द शिवाजी नगर येथील समाजवादी पक्षाचे उमेदवार, अबू असीम आझमी यांनी मुफ्ती अझरी यांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, सत्तेत आल्यास प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात निंदनीय टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

कोण आहे मुफ्ती अझरी ?
मुफ्ती अझरी या मौलवीचा हिंदू विरोधी गरळ ओकण्याचा बराच मोठा इतिहास आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये जुनागढ येथे भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी तो आणि त्याच्या २ साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील शेलक्या शब्दात टिका केली होती. त्याच्या भाषणाच्या क्लिपीस् व्हायरल झाल्यानंतर त्यच्यावर जागोजागी गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्याच सोबत एका संस्थेकडून एकाच वर्षात २७ लाख रूपयांची रक्कम या मौलवीने उचलल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
 
Powered By Sangraha 9.0