इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाच्या मीडिया प्रमुखासह १० ठार

19 Nov 2024 12:25:17
Israel Air Attack

तेल अवीव : हिजबुल्लाचा मीडिया संबंध प्रमुख मोहम्मद अफिफ लेबनीज राजधानी बेरूतमध्ये इस्रायली ( Israel ) हल्ल्यात ठार झाला. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफ हल्ल्यात अफिफ मारला गेला. दरम्यान, लेबनॉनच्या टायर भागात इस्रायलच्या हल्ल्यात दहाजण ठार, तर ४८ जण जखमी झाल्याचे लेबनॉनच्या मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. अफिफने अलीकडेच पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हिजबुल्लाकडे इस्रायलविरुद्ध ’दीर्घ युद्ध’ लढण्यासाठी पुरेशी शस्त्रे आहेत. अफिफची हत्या हे हिजबुल्लाच्या नेतृत्वाला संपवण्याच्या इस्रायलच्या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. यापूर्वी लेबनॉन आधारित गटाने हाशेम सफिदीनला प्रमुख म्हणून नियुक्त केल्यानंतर इस्रायलने हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाला ठार मारले होते.”


Powered By Sangraha 9.0